येत्या काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी लाभदायक ठरणाऱ्या योजना अधिक प्रभावीपणे राबवू, चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

7
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भोर मधील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसारखे दुसरे पुण्य नाही, असे पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, राज्य सरकारने ७५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीने मोफत प्रवास अशी योजना सुरू केली आहे. याचा अनेक ज्येष्ठ नागरिकांना लाभ होत आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सुकर व्हावे यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. येत्या काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी लाभदायक ठरणाऱ्या योजना अधिक प्रभावीपणे राबवू अशी ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.
यावेळी किरण दगडे पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.