पूरग्रस्तांना मदतीसाठी परळीत मदत फेरीचे आयोजन

परळी : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात महापुराने थैमान मांडले असताना आता मराठवाड्यातील भाजप देखील मदत कार्यात उतरले आहे.
राज्यातील अतिवृष्टीबाधित व पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आज परळी शहरात भाजपच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात शहरातून मदतफेरीचे काढण्यात आली आणि स्थानिकांना मदतीसाठी आवाहन देखील करण्यात आले.


या मदतफेरीस अनेक दानशूर नागरीकांनी वस्तू आणि निधी स्वरूपात मदत करून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मदत फेरीमध्ये भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच वैद्यनाथ कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते. मदत फेरीमुळे पूरग्रस्तांसाठी मोठी रक्कम जमा झाली तसेच व्यापाऱ्यांनी किराणा साहित्य व इतर जीवनावश्यक वस्तू दिल्या. ही सर्व मदत एकत्रित ट्रकद्वारे पूरग्रस्तांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली.