आ. विनायक मेटेंच्या हाती सुदर्शन चक्र, शिवसेना माजी शहरप्रमुख सुदर्शन धांडे शिवसंग्राममध्ये दाखल

13

बीड : बीड शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर, शिवसेनेचे माजी बीड शहर प्रमुख यांनी काल  पुणे येथे शिवसंग्रामच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत शिवसंग्राम मध्ये औपचारिकरित्या  प्रवेश केला.  आमदार विनायक मेटे यांनी त्यांच्या वर शिवसंग्रामच्या महाराष्ट्रप्रदेश ‘ सरचिटणीस ‘ पदाची जवाबदारी देत त्यांचा सन्मान करत शिवसंग्राम मध्ये स्वागत केले. बीड मध्ये कर्मयोगी परिवाराच्या माध्यमातून हजारो गरजू विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे अल्लेखनीय काम त्यांनी मोठ्या प्रमाणात गेले अनेक वर्षांपासून सुरु केले आहे, सेने मध्ये असतानाही त्यांच्या कार्याची दाखल वेळोवेळी घेण्यात आली आहे. उत्तम संघटन कौशल्य असलेले सुदर्शन धांडे यांनी काही दिवसापूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. 


सुदर्शन धांडे यांनी बीड शिवसेना शहर प्रमुख असताना नगराध्यक्ष पदासाठी दिवडणूक लढवत, क्षीरसागर यांच्या पुढे मोठे आव्हान उभे केले होते. मेटे यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक असलेले सुदर्शन धांडे यांच्या शिवसंग्राममध्ये दाखल होण्याने बीड विधानसभा मतदार संघात शिवसंग्रामची तटबंदी आणखी मजबूत झाली आहे.  मेटेंच्या हाती असलेल्या सुदर्शन चक्राने बीड शहरात भविष्यात कोणते राजकीय चमत्कार घडणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.