व्यसनमुक्तीचा निर्धार करुया, सशक्त भारत घडवुयात – विनायक मेटे

15

बीड : आज शिवसंग्रामच्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त बीड येथे तंबाखूजन्य पदार्थांचे दहन करण्यात आले त्यावेळी शिवसंग्राम चे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या समवेत बीड शहर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार मेटे यांनी यावेळी व्यसन मुक्ती आणि सशक्त भारताचा नारा दिला. 

Maha Rally at Beed by shivsangram Chief MLC Vinayak Mete


शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार  विनायक मेटे हे  बीड जिल्हा व्यसन मुक्त व्हावा यासाठी गेली अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत . ३१ डिसेंबर च्या दिवशी सकाळी व्यसनमुक्तीचा प्रचार करण्यासाठीमहारॅली  व  नववर्षाच्या पूर्व संध्येला व्यसन मुक्ती संगीत रजनीचे आयोजन ते गेले काहीवर्षांपासून करीत आहेत. बीड शहरातील नागरिकांचा या स्तुत्य उपक्रमास भरगोस प्रतिसाद मिळत आहे.