५० लाख रुपये द्या अन्यथा वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवू!

72

बीड: बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी मंदिर ट्रस्टला आलीय. या धमकीमुळे खळबळ उडाली आहे. नांदेडहून हे धमकीचे पत्र आल्याचे सांगण्यात आले आहे.या धमकी पत्रात 50 लाख रुपये द्या अन्यथा मंदिर उडवू असं,सांगण्यात आलंय.तसेच परळी शहर पोलीस स्टेशनला धमकीचे पत्र मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

वैद्यनाथ मंदिरातील पोलीस बंदोबस्त तत्काळ वाढवण्यात आला आहे.याच पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची यांनी धमकी देणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करण्यात येत असून बीड जिल्ह्यातील भाविकांनी घाबरुन जाऊ नये,प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही असे आवाहन केले आहे.

ट्विटमध्ये मुंडे म्हणाले आहेत की,’श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंग मंदिरास आरडीएक्सने उडवण्याची धमकी मंदिर ट्रस्टला मिळाली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, डीजीपी, बीड एसपी, तसेच दहशतवाद विरोधी पथकास याबाबत माहिती दिली असून, पोलीस खाते याबाबत त्वरित अ‌ॅक्शन घेत आहे.तसेच ५० लाख रुपयांची मागणी करून धमकी देणारे गजाआड दिसतील’, असेही मुंडे म्हणाले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.