‘राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना’, चित्रा वाघ यांचं ट्विट
पुणे: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काल शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण वादळी ठरले. या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी भाजपा, पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विविध मुद्द्य्यांवरून त्यांनी टीका देखील केली. परंतू राज्यात पुन्हा एकदा आरोग्य विभागाच्या परीक्षांचा गोंधळ उडाला असून, यामुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरं जावे लागत आहे.
त्यामुळे आता अगोदरच कालच्या भाषणावरून संतप्त झालेल्या भाजपा नेत्यांनी हा परीक्षेतील गोंधळाचा मुद्दा देखील उचलून धरला आहे. भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटद्वारे टीका केली आहे
चित्रा वाघ यांचं CM साठी Tweet
मुख्यमंत्री काल म्हणालेत की मी मुख्यमंत्री बनून माझ्या वडीलांचं स्वप्न पूर्ण केलंय, दोनदा आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ झालाय. साहेब… राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडीलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना, असं ट्वीट चित्रा वाघ यांन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलं.
मुख्यमंत्री काल म्हणालेत कि मी मुख्यमंत्री बनून माझ्या वडीलांचं स्वप्न पूर्ण केलंय…
दोनदा आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ झालाय..
.
साहेब… राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडीलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना……— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 16, 2021
तसेच, “मुख्यमंत्री कालच्या भाषणात गोंधळलेले दिसले, तीच परंपरा प्रशासनानं सुरू ठेवलीय. हे सरकार सलग दुसऱ्यांदा आरोग्य विभागाची परिक्षा घेण्यात नापास झालंय. सरकारी चुकीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही त्यांना पुन्हा संधी द्यावी ही आमची मागणी आहे. भोंगळ कारभार, गोंधळी सरकार !” अशी टीका देखील चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.