खासदार अमोल कोल्हे यांच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर वॉच

23

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली तरी विरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक होत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या होत असलेल्या आजच्या महापालिका सर्वसाधारण सभेला शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अचानक हजेरी लावली. नागरिकांच्या कक्षात बसून आपले नगरसेवक सभागृहात सत्ताधारी भाजपाच्या विरोधात बोलतात की नाही हे पाहण्यासाठी डॉ. कोल्हे यांनी वॉच ठेवला.

हे पण वाचा: खासदार अमोल कोल्हे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. त्याची आचारसंहिता डिसेंबरच्या शेवटच्या किंवा जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात लागू शकते. त्यामुळे आजची सभा धरून केवळ तीन सर्वसाधारण सभा होतील.

हे पण वाचा: शाहरुख खानला मोठा धक्का! आर्यन खानचा जामीन फेटाळला

त्यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या होत असलेल्या आजच्या ऑफलाइन सर्वसाधारण सभेला शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अचानक हजेरी लावली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे सुद्धा उपस्थित होते.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.