2500 नागरिकांचे लसीकरण, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार, लहू बालवडकर यांच्या महा लसीकरण अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

9

पुणे: देशामध्ये जवळपास गेल्या  दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला होता. आता कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आहेत आणि लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. त्यामुळे भारताने कोरोना लसीचा १०० कोटी डोसचा आकडा पार करून इतिहास रचला आहे. देशातील १०० कोटीचे टार्गेट पुर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप सरकार दोन पाय घट्ट करून मैदानात उभे असतानाच भाजप सदस्य आणि समाजिक कार्यकर्ते लहु बालवडकर यांच्या सोशल वेलफेअरच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेने आज २५०० लसीकरणाचा टप्पा पार करत सरकारच्या मोहीतमेत भर घातली आहे. नरेंद्र मोदींच्या प्रेरणेने बालवडकरांनी २५०० टप्पा पार करत राज्यातील लोकप्रतिनिधींसमोर एक नवा आदर्श निर्माण आहे. लहू बालवडकर यांच्यावर सर्व स्तरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.

भाजप सरकारच्या कोविन अॅपनुसार सध्या भारतात ७४ हजार २३४ सरकारी आणि खाजगी लसीकरण केंद्रे आहेत. यामध्ये ७१ हजार ६४६ सरकारी आणि २ हजार ५८८ खाजगी केंद्र आहेत. त्यातील एक म्हणजे बाळासाहेब देवरास पॉलिक्लिनिक, सिरम इन्स्टिटयूट, PPCR, पुणे वैद्यकीय सेवा प्रतिष्ठान, फर्स्ट एड पॉलिक्लिनिक आणि सोशल वेलफेअर यांच्या संयुक्त विद्यमाने लहु बालवडकर यांच्या पुण्यातील बालेवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात मोफत लसीकरण महाअभियान सुरु करण्यात आले होते.  या लसीकरण मोहिमेत २५०० लसीकऱणाचा टप्पा पुर्ण झाला आहे.

सामाजिक कार्यकर्ते लहु बालवडकर हे सोशल वेलफेअरच्या माध्यमातून संकटकालीन परिस्थितीत गरिब आणि गरजू नागरिकांना नेहमीच मदतीचा हात देत असतात. त्यामध्ये आरोग्य, अन्नधान्य यांसह आर्थिक समस्यांनाही हातभार लावतात.  बालवडकर यांनी बाणेर, बालेवाडी, सुस आणि म्हाळुंगे परिसरातील  २५०० नागरिकांचे लसीकरण करून आपला परिसर कोरोना पासून सुरक्षित करण्यात मोठे योगदान दिले आहे. या लसीकरण मोहिमेत मोलाची साथ देणाऱ्या नर्सेस व इतर आरोग्य कर्मचारी यांचा लहु गजानन बालवडकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कोरोना महामारी विरोधात लढण्यासाठी या मोफत लसीकरण मोहिमेत बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे येथील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे व आपल्या देशाला, आपल्या शहराला, आपल्या परिसराला कोरोना महामारीमुक्त करावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत यावेळी भाजपा सदस्य व लसीकरण मोहिमेचे आयोजक लहु बालवडकर यांनी व्यक्त केले.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.