लहु बालवडकर सोशल वेलफेअरच्या वतीने बालेवाडी, बाणेर, सुस व म्हाळुंगे येथील नागरिकांसाठी सांगितीक मेजवानी!

12

पुणे: दिवाळी निमित्त लहु बालवडकर सोशल वेलफेअर यांच्या वतीने शास्त्रीय, सुगम व भावगीतांची  सायंकालीन मैफल “सुर संध्या” या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर आणि निवेदक मृण्मयी देशपांडे यांच्या शास्त्रीय, सुगम व भावगितांची सायंकालिन मैफल रंगणार आहे.

सुर संध्या हा सांगितीक कार्यक्रम बुधवारी 3 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. बाणेर येथील मुंबई-बेंगलोर हायवेवर असलेल्या मर्सिडीज शोरूम जवळील बंटारा भवन सभागृहात पार पडणार आहे. या कार्यक्रमाला पुणे शहराचे प्रथम नागरिक, महापौर मुरलीधर मोहोळ आणि रा. स. संघाचे कार्यवाह महेश करपे उपस्थित राहणार आहे.

मागील बऱ्याच काळात कोरोनामुळे आपल्याला आपले सण साजरे करता आले नाही. या वेळी कोरोना वर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळविल्याने कार्यक्रम घेण्यास असलेले निर्बंध उठवण्यात आले आहे. म्हणुनच प्रभागातील नागरिकांची दिवाळी खास करण्यासाठी, संगीताची आवड असणाऱ्या नागरिकांसाठी दिवाळीचा निमित्त साधून शास्त्रीय, सुगम व भावगीतांची सायंकालीन मैफल “सुर संध्या” या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा अशी विनंती भाजपा युवा नेते लहू बालवडकर केली आहे.

Read Also :

 

Get real time updates directly on you device, subscribe now.