कांदिवली येथील हंसा हेरिटेज इमारतीला आग, दोघांचा मृत्यू

मुंबई: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली येथे हंसा हेरिटेज या इमारतीच्या चौदाव्या मजल्याला काल (दि.६) नोव्हेंबरला रात्री भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत दोघांचा मृत्य झाल्याची माहिती समोर येत आहे. इमारतील नागरिकांना सुरक्षित आहेत.
रात्री आठच्या सुमारास आग लागली होती, घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांच्या मदतीने 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात आली. घटनास्थळी पोहोचत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. आग लागली तेव्हा काही लोक आत अडकले होते, त्यापैकी काही जखमी झाले आणि दोन जणांचा मृत्यू झाला. कांदिवलीतील आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. रंजनाबेन पारेख 90 वर्ष व निता पारेख 64 वर्ष अशी मृतांची नावे आहेत.
या घटनास्थळाला मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकरांनी भेट दिली असून, त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेतलाय. चौदाव्या माळ्यावरती, आपण दिवे लावतो त्या दिव्यांमुळे आग लागली आहे, असं त्यांच्या घरातील एक सदस्य मला भेटले आणि त्यांनी मला हे सांगितलं. अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत. प्रयत्नांची शिकस्त आहे. काही जण जखमी आहे, तर मृत्यूही झाल्याचं मला माहिती मिळालीय, असंही त्या म्हणाल्यात.
Read Also :