‘‘कोरोनाची लस मी घेतली नाही आणि घेणारही नाही’’; कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य

नाशिक: महाराष्ट्रासह देशाभरात नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी म्हणून शासन प्रशासन प्रयत्नांची पराकष्ठा करत आहेत. मात्र कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी लसीकरणाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कोरोनाची लस घेतली पण नाही आणि घेणारही नाही, असं ते म्हणाले आहेत. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या वक्तव्याने आता नवा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

निवृत्ती महाराज इंदोरीकर आपल्या नवनव्या वक्तव्यांनी चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. त्यांच्या पाठीमागचा वादाचा फेरा काही संपत नाही. पाठीमागे मुलगा आणि मुलीच्या जन्मावरुन त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते वादाचं मोहोळ शांत होत नाही तोपर्यंत इंदोरीकर महाराजांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. नाशिक जिल्ह्यातील एका कीर्तनाच्या सोहळ्यादरम्यान ‘कोरोनाची लस घेतली पण नाही आणि घेणारही नाही’, असं ते म्हणाले.

“कोरोना काळात शिक्षित लोकांनी चुकीचं वर्तन केलं. आपल्याच घरातील प्रिय व्यक्तींना, जवळच्या व्यक्तींना अतिशय चुकीच्या पद्धतीने वागवलं. त्यांना चांगल्या ताटात जेवणं दिलं नाही. त्यांच्या अंथरायच्या पांघरायच्या गोधड्या जाळल्या. त्यांच्या हाताला स्पर्श होणार नाही, इतकं फटकून त्यांच्याशी वागले. इथं हात लावू नको, तिथं हात लावू नका.. अशी सगळी कोरोना काळात परिस्थिती होती. पण मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतंच नाही तर लस कशाला घ्यायची”, असं इंदोरीकर महाराज म्हणाले.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!