घृणास्पद! कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी
मुंबई: अबुधाबी येथे सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताला सलग दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही भारताला विजय मिळवता आला नाही. भारतीय संघाच्या कामगिरीवरून टीका-टिप्पणी केली जात आहे.
मात्र, काही जणांकडून खेळाडूंना घाणेरड्या पद्धतीनं ट्रोल केलं जात असून, आता विराट कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी एकाने दिली आहे. या प्रकरणाची दिल्ली महिला आयोगानं दखल घेतली आहे.
सलग दुसऱ्या सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल चर्चा सुरू झाली. मात्र, अनेकांनी संघातील खेळाडूंना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरूवात केली. रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, इशान किशनसह इतर खेळाडूंवर ट्रोलर्सनी हल्ला केला.
दरम्यान, विराट कोहलीच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. कोहलीच्या नेतृत्वावरही टीका होत असून, सोशल मीडियावर काही जण मर्यांदा ओलांडून ट्रोल करत असल्याचं समोर आलं आहे. कोहलीची मुलगी वामिकावर बलात्कार करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणाची दखल दिल्लीतील महिला आयोगाने घेतली आहे. महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस दिली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईबद्दल विचारणा करत काही प्रश्न पोलिसांना विचारले आहेत. महिला आयोगाने दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम सेलला प्रश्न विचारले आहेत.
Read Also :
-
लहु बालवडकर सोशल वेलफेअरच्या वतीने बालेवाडी, बाणेर, सुस व म्हाळुंगे येथील…
-
भाजपला मोठा झटका; दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय
-
फटाके जरूर फोडा पण धूर काढू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना टोला
-
सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना? अनिल देशमुखांच्या अटकेनंतर राम कदमांचा…