भाजपने सरकारी कंपन्यांप्रमाणे तपासयंत्रणा आणि तुरुंगांचेही खासगीकरण केलेय; सामनातून संजय राऊतांचा घणाघात

मुंबई: महाराष्ट्रातले भाजपचे नेते महागाईवर बोलत नाहीत. पेट्रोल पाच रूपयांनी कमी झालं आहे म्हणून बागडत आहेत. पण पाच रूपये कमी करूनही पेट्रोल आणि डिझेलने शंभरी ओलांडलेलीच आहे. एवढंच नाही तर भाजपचे नेते रोज सकाळी उठून याला तुरूंगात टाकणार, त्याला तुरुंगात टाकणार असे धमकावत असतात. देशातल्या सरकारी कंपन्या तर केंद्राने विकल्या, अनेक उपक्रमांचं खासगीकरण केलं. तसंच आता तुरुंगाचं खासगीकरण झालं आहे का? असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमधून विचारला आहे.

देशातील अनेक सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण मोदी यांच्या सरकारने केले. अनेक सरकारी कंपन्या आपल्या मर्जीतील उद्योगपतींना विकण्यात आल्या. ‘‘दोघेजण विकायला बसलेत व दोघेच जण खरेदी करतात,’’ अशी टवाळी त्यावर सुरू आहे.

आता रेल्वेपासून एअर इंडियापर्यंत सगळेच खासगी झाले. त्याचवेळी महाराष्ट्रात याला तुरुंगात टाकू व त्यालाही तुरुंगात टाकू, असे भाजपचे नेते रोज सकाळी उठून सांगतात. तेव्हा देशातील तुरुंगांचेही खासगीकरण झाले काय? असा प्रश्न पडतो. मोदी है तो मुमकीन है! हे अशा वेळी खरे वाटते. 2024 पर्यंत हे सहन करावेच लागेल. संपूर्ण देशच हळूहळू तुरुंग होताना दिसत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

केंद्र सरकारने पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 10 रुपयांनी स्वस्त केले. यामुळे ‘भाजप’चे लोक खूश झाले व पहा आपले पंतप्रधान किती मोठय़ा मनाचे असे सांगू लागले. शंभरी पार केल्यावर पाच-दहा रुपये कमी करणे हा दिलासा म्हणता येणार नाही. 13 राज्यांतील पोटनिवडणुकांत भाजपचा पराभव झाल्यावर हे पाच रुपये कमी केले.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!