रत्नागिरी जिल्हा हादरला! साखरपा, संगमेश्वर, देवरूख परिसरात भूकंपाचे धक्के

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे  धक्के जाणवले आहे. महिन्याभरातील ही दुसरी घटना असून, जिल्ह्यातील साखरपा, संगमेश्वर आणि देवरूख परिसराला भुकंपाचे धक्के बसले. भर झोपेत असताना भूंकप झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहाणी झालेली नाही. रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली, भूकंप होत असल्याचे लक्षात येताच नगरिकांनी घराबाहेर धाव घेतली, त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री अडीचच्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपांचे धक्के जाणावले, जिल्ह्यातील साखरपा, संगमेश्वर आणि देवरूख परिसरात या भूकंपाची तिव्रता अधिक होती. चार रिस्टल स्केल एवढी या भूकंपाची तिव्रता नोंदवण्यात आली आहे. मुंबईपासून जवळपास 350 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते.

दरम्यान या भूकंपामध्ये कुठलीही जीवित अथवा वित्त हाणी झाल्याची बातमी आतापर्यंत मिळालेली नाही. भूकंपाच्या घटनेचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती  स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. भूकंपामुळे कुठलेही नुकसान झाले नाही, मात्र नागरिकांमध्ये भितीचे वातावर असल्याचे पहायला मिळत आहे. एक महिन्याच्या आत जिल्ह्याला दोनदा भूकंपाचा धक्का बसला आहे.  या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.