आम्ही प्रश्न विचारतच राहू, प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही; आशिष शेलार यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई; राज्यात सध्या महापालिका आणि इतर प्रश्नांवरुन भाजपकडून राज्य सरकावर निशाणा साधला जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून विरोधकांकडून केल्या जात असलेल्या प्रश्नांचा आणि टीकेचा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. प्रश्न विचारणे सोपे असते. ते विचारायला अक्कल लागत नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला होता. आता भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

“गारगाई धरणाच्या खर्चाच्या कितीतरी पट जास्त खर्च करुन समुद्राचे पाणी गोडे करण्याचा हट्टाहास का?, गेल्या २४ वर्षात २१ हजार कोटी खर्च करुनही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे का?, ११४ टक्के नालेसफाई करुनही मुंबईत पाणी का तुंबते?, मुंबई पालिका वर्षाला साडेचार हजार कोटी आणि पाच वर्षात २२ हजार ५०० कोटी खर्च करुन ही पालिकेच्या रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडून रुग्ण मरतोच कसा?, वरळीच्या सिलेंडर स्फोटातील रुग्णांचा मृत्यू का झाले?

मृतदेहा शेजारीच कोरोना रुग्णांना उपचार का दिले?, परिक्षा रद्द करणारेच विद्यापीठात पदवीदान समारंभाला पाहुणे कसे?, ज्यांनी प्रकल्पांना विरोध केला तेच आज प्रकल्पांचे श्रेय घ्यायला आणि नावं द्यायला पुढे पुढे कसे?,मुंबईत गेल्या ११ वर्षात ४० हजार झाडांची बिल्डरांसाठी कत्तल केली, मग मुंबईकरांची मेट्रो कारशेडच का अडवून ठेवली?” अशा प्रकारे आशिष शेलार यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

तसेच, “कोस्टलरोडच्या कामात १६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग कसा?, मुंबईतील आरक्षणे बदलून भूखंडांचे श्रीखंड कुणी खाल्ले?, मुंबईतील गिरणी कामगार कुठे गेले?, असे बरेच प्रश्न मुंबईकरांना रोज पडतात, आम्ही ते विचारत राहू! कारण…प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही?” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर प्रत्युत्तरंही दिलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!