भाजपकडून जातीयवाद्यांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न – शरद पवार

16

नागपूर: गेल्या महिन्यात त्रिपुरातील हिंसाचाराचा वणवा आता महाराष्ट्रात पोहोचला आहे.  राज्यात हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. अमरावती, नांदेड आणि नाशिक या तीनही शहारांमध्ये वातावरण चिघळं असून अमरावतीच्या राजकमल चौकात दुकानांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. यावरुन आता राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, सध्या सांप्रदायिक विचार, जातीयवाद्यांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न होतोय. जातीवादी विचार माणसामाणासात द्वेष निर्माण करत आहे. हा विचार राबवणाऱ्या शक्तिंना खड्यासारखं बाजूला ठेवणं आपलं कर्तव्य आहे. आदिवासी अशा शक्तींना कधीही बळी पडत नाही, असं पवारांनी सांगितलं. त्रिपुरातील घटनेचे अमरावतीत पडसाद का उमटले? असा सवाल त्यांनी केला. भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी संमेलनात वनवासी हा शब्द वापरला. त्यांच्या भाषणात आदिवासी हा शब्दच नव्हता. पण आदिवासी समाजाला वनवासी शब्द मान्य नाही, असा टोला त्यांनी मोदींना लगावला. आदिवासी हा जंगलाचं रक्षण करण्याचं काम करतोय. जल, जमीन, जंगलाचं रक्षण आदिवासी करत आहे. त्यामुळे आदिवासींकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला पाहिजे, असं पवारांनी सांगितलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.