भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अमरावती मध्ये राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पर्धेच्या तयारीचा घेतला आढावा

5

अमरावती : भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अमरावती मध्ये गुरुकुलम् बहुउद्देशीय शिक्षण संस्था व अमरावती जिल्हा अथलेटिक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडली.

स्पर्धेचे यंदा द्वितीय वर्ष असून, ही उत्साहात संपन्न व्हावी; तसेच, यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करावेत, त्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी आश्वस्त केले. यायला पाटील यांच्या हस्ते वेबसाईटचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी स्पर्धेचे आयोजक तुषार भारतीय, आ. प्रवीण पोटे पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.