पिपरी-चिंचवड येथील पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेला बसला ‘हुशार’ डमी उमेदवार

13

पिंपरी: पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरतीची लेखी परिक्षा शुक्रवारी (दि.19) पार पडली. या परिक्षेत काही अनुचित प्रकार समोर आले आहेत. हिंजवडी येथील परीक्षा केंद्रावरील एका उमेदवाराने मास्क मध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवल्याचे आढळून झाले होते.

त्यानंतर आता बावधन येथील एका परिक्षा केंद्रावर परिक्षेसाठी डमी परीक्षार्थी बसल्याचे निष्पण्ण झाले आहे. याप्रकरणी मूळ परिक्षार्थी आणि डमी असे दोघांनाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मुनाफ हुसैन बेग (रा, काळेगाव, जालना) आणि प्रकाश रामसिंग धनावत (रा. मुपोकरमाड, औरंगाबाद) असे अटक आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरतीची लेखी परिक्षा शुक्रवारी (दि.19) पार पडली. बावधन येथील अरिहंत इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या परिक्षा केंद्रावर मूळ परीक्षार्थी प्रकाश धनावट याच्या जागी मुनाफ बेग हा विद्यार्थी डमी बसला होता. डमी परीक्षार्थीने मूळ उमेदवाराची खोटी सही करून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.