विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड

24

मुंबई: काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीने सातव यांना पाठिंबा दिला होता, भाजपा उमेदवारांने अर्ज मागे घेतल्याने सातव यांची बिनविरोध झाली. ही पोटनिवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष तसेच विरोधी पक्ष भाजपाचे आभार मानले.

निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांना प्रज्ञा सातव यांना प्रमाणपत्र देताना विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. या मान्यवरांनी विजयी उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

राजीव सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं होतं. त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपद देवून पक्षाने मोठी जबाबदारी दिली होती. त्यानंतर त्या हिंगोली कळमनुरीत सक्रिय झाल्या होत्या. महिलांच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यापासून ते मतदारसंघातील कामांबाबतचा आढावा घेण्यास त्यांनी सुरुवात केली होती. मधल्या काळात त्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची भेट घेऊन चर्चाही केली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.