मोठी बातमी : राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी अधिकच वाढत चालल्या आहेत. मोदी आडनावावरून मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर आता पुढे राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांना दोषी ठरवत त्यांना दोन वर्षांची  शिक्षा सुनावली आहे. यासोबतच आता लोकसभा सचिवालयाने सदस्यत्व रद्द करण्याची मोठी कारवाई केली आहे.

सुरत न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणी राहुल गांधी यांना दोषी ठरवले आहे. मोदी आडनावावरून त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांना उच्च नायालयात अपील करता यावे यासाठी त्यांना ३० दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. त्यांना जमीन देण्यात आला आहे. त्यांतर आज लोकसभा सचिवालयाने मोठी कारवाई करत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे.
देशातील कोणत्याही सक्षम न्यायालयाने कुणाही लोकप्रतिनिधीला किमान दोन  किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर सदस्यत्व त्याचक्षणी रद्द होईल, असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याचाच आधार घेऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे.