मोठी बातमी! मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे निलंबन

32

मुंबई: महाराष्ट्र सरकारने केलं परमबीर सिंग यांचं निलंबन केलं आहे. DG होम गार्ड या पदावर परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली होती. त्यावरून आता त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. बुधवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंग यांना निलंबित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. एवढंच नाही तर परमबीर सिंग यांनी आयोगापुढे गैरहजर राहणं, त्यांनी चौकशीसाठी समोर न येणं या सगळ्यासाठी शिस्तभंगाची कारवाईही केली जाणार आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या संमतीशिवाय राज्य सोडू नये असेही निर्देश देण्यात आले आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप केल्यानंतर परमबीर सिंग मधला बराचसा काळ गायब होते. दरम्यानच्या काळात परमबीर यांच्याविरुद्ध मुंबई आणि ठाण्यात खंडणीचे गुन्हेही दाखल करण्यात आले. दरम्यान राज्याच्या गृह मंत्रालयाने परमबीर सिंग यांच्याविरुद्ध प्रशासकीय कामकाजातल्या गलथानपणावर चौकशी लावली होती.

तत्कालीन अतिरीक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांचा परमबीर यांच्याविरुद्धचा अहवाल राज्य शासनाने स्विकारला असून लवकरच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर त्यांच्याकडे होमगार्डची सूत्र देण्यात आली होती. परंतू परमबीर मधल्या बऱ्याच कालावधीसाठी कामावर हजर नव्हते. आता आज त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.