हिवाळी अधिवेशन: प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचितचा विधानभवनावर मोर्चा

4

मुंबई: ओबीसी आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा मुंबईतील विधानभवनावर दाखल होणार आहे. तसेच या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर करणार आहेत. राज्यातील असंख्य कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार आहेत. या मोर्चामध्ये राज्यभरातील ओबीसीच्या संघटना, नेते, कार्यकर्ते आणि समाजातील सर्व घटक असे मिळून मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.

मुंबईतील विधानभवनावर आज वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा धडकणार आहे. त्यासाठी पहाटेच्या सुमारास पुण्यातून असंख्य कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. वंचितचे कार्यकर्ते पुण्याहून मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती वंचितचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर यांनी दिली. ओबीसी आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीकडून मागणी करण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून इम्पेरिकल डेटा मागितला होता. त्यासंदर्भात राज्य सरकारने राज्यभरात जातनिहाय जनगणना करावी, अशी ओबीसींची प्रमुख मागणी असल्याचं गुजर यांनी सांगितलं आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी विधानसभा अधिवेशनावर २३ डिसेंबर रोजी मार्चाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत जमावबंदी लावण्याचे कोणतेही सबळ कारण दिसत नाही. सरकार कायद्याचा दुरूपयोग करून जनतेचा आवाज दाबणार असेल तर सरकारचा जमावंबदी आदेश झुगारून आम्ही मोर्चा काढू, असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.

Get real time updates directly on you device, subscribe now.