सभागृहात राज्यपाल महोदयांनी हिंदी भाषेत केलेले भाषण हा महाराष्ट्राचा अपमान आहे, जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र

23
आज महाराष्ट्रात मराठी भाषा दिन उत्साहाने साजरा केला जातो. विधानसभेत सर्व सदस्य मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी एकत्रित आले, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
आव्हाड माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले कि, मराठी भाषेबाबत अनेक संशोधकांनी संशोधन केले. ज्येष्ठ साहित्यिका दुर्गा भागवत म्हणतात की, मराठी ही संस्कृतपेक्षाही आधी मराठी भाषेचा जन्म झाला आहे. एकीकडे दक्षिण प्रांतातील आण भाषा अभिजात दर्जा घेऊन बसल्या आहेत. मराठी भाषा आजही दिल्लीच्या तख्तावरती डोकं घासते की आम्हाला अभिजात दर्जा देण्यात यावा. अजूनही दिल्लीकडून अभिजात दर्जा देण्याबाबत होकारार्थी भाव कळवले नाहीत, असे आव्हाड म्हणाले. सभागृहात आज राज्यपालांनी हिंदी मधून केलेल्या भाषणावर देखील आव्हाड यांनी टीका केली.
पुढे ते म्हणाले की, विधानसभेत व विधानसभेच्या संयुक्त सभागृहात राज्यपाल महोदयांनी हिंदी भाषेत केलेले भाषण हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. महाराष्ट्र आणि मुंबईच्या मातीला भाषेचा सुगंध आहे. त्या प्रांतामध्ये येऊन ती भाषा न बोलता उत्तर भारतातील हिंदी इथल्या मराठी लोकांच्या डोक्यावर बसवण्याचे काम सत्ताधारी पक्षांनी केले आहे. राज्यपालांच्या भाषणाला कॅबिनेटमध्ये मंजूर केले जाते. कॅबिनेटमध्ये हिंदी भाषेला मंजुरी दिली. आज मराठी भाषा दिन आहे हे दुर्दैव आहे. राज्यपालांनी मराठीतच बोलायला हवे होते. ही चूक खरं तर कॅबिनेटची आहे, अशी खंत आव्हाड यांनी व्यक्त केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.