गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; २० कर्मचारी पॉझिटिव्ह

26

मुंबई: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राज्य सरकारमधील १० मंत्र्यांना आणि २० पेक्षा अधिक आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. नेत्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही आता कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयात ४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांमधील २१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सुरुवातीला ४ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती राज्याच्या गृहमंत्री कार्यालयाने दिली आहे.

राज्यात १३ मंत्री आणि ७० आमदारांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर आता राज्याच्या गृहमंत्रालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची बाब समोर आली आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुरुवातीला ४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये २१ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गृहमंत्री वळसे पाटील यांच्या खासगी सचिवासह इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अद्याप १५ जणांचा रिपोर्ट येणं बाकी आहे. यामुळे कुठेतरी कार्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे. कार्यालयातील अर्धे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.