खासदार अमोल कोल्हेंचा शिवनेरीवरील शिवजन्मोत्सवावर बहिष्कार

34

छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त किल्ले शिवनेरीवर विविध शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या शासकीय कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांनी बहिष्कार करत असल्याचे जाहीर केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गटावर अदयाप भगवा ध्वज न फडकवल्याने अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करत बहिष्कार टाकला असल्याची भूमिका घेतली आहे.

अमोल कोल्हे यांनी शिवनेरी गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीला केंद्र किंवा राज्य सरकारने दाद दिली नाही. यामुळे अमोल कोल्हे यांनी शासकीय शिवजयंतीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एक वीडियो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

त्यांनीं म्हटले कि, शिवनेरी किल्ल्यावर होणाऱ्या शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमाची पत्रिका मला मिळाली आहे. त्यासाठी सरकारचे आभार मानतो. मी शिवजयंती साजरी करणारच आहे. शिवभक्तांसाठी हा मोठा सण आहे. पण त्याचबरोबर शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ल्यावर मुख्यमंत्री  शिंदे आणि  इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या शिवजयंतीला खासदार म्हणून मी बहिष्कार करत आहे.

एवढी वर्ष झाली तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान असलेल्या शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज  नाही. मी सातत्याने हि मागणी करत आहे. संन्स्डेत देखील मी हि मागणी केली होती. राज्यांच्या जन्मस्थानावर भगवा ध्वज ननसल्याची जाणीव करून देण्यासाठी मी शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहे, असे त्यांनी नामूद केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.