आम्ही फसत राहू पण आज महाराष्ट्र फसणार नाहीय, आदित्य ठाकरेंचे राज्य सरकारवर टीकास्त्र

4

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे आजपासून शिवसंवाद यात्रेसाठी निघाले आहेत. नाशिकच्या इगतपुरीहुन या यात्रेला सुरुवात झाली असून यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद , जालना, बीड अशा प्रकारे हि यात्रा असणार आहे. इगतपुरीमध्ये यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. शिवसेनेत कोणताही गट नसून जे गेले ते गद्दार आणि राहिलेले ते शिवसैनिक असल्याचे आदित्य ठाकरे यांनीं म्हटले. आम्ही फसत राहू पण आज महाराष्ट्र फसणार नाहीय, असे त्यांनी म्हटले.

आदित्य ठाकरे यांनी या भाषणादरम्यान म्हटले कि, आपले मुख्यमंत्री २८ तास डाव्होसला गेले. खर्च झाले ४० कोटी पणन उद्योग किती आले हे अजून सांगू शकत नाहीय. इकडे- तिकडे आकडे सांगतात. मी तर त्यांना सांगेन कि तुम्ही १०० लाख कोटींच सांगा. कुणाला किती शून्य आहेत त्यात ते कळणारच. आम्ही फसत राहू पण आज महाराष्ट्र फसणार नाहीय, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाहीय. तुम्ही लिहून घ्या हे मंत्रिमंडळ तर पडणारच. पडण्याआधी विस्ताराचा होणार नाहीय. फक्त गाजर देऊन ठेवलीयेत. सगळ्या आमदारांना कि ती तुला मंत्री बनवतो. आता एकही नवीन मंत्री बनणार नाहीय. हे सरकार चालणार कस? हे सरकार नक्की कुणाचं आहे. दिल्लीश्वरांचं आहे कि महाराष्ट्राचं हा प्रश्न पडला आहे. असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
आज जे सरकारमध्ये बसलेत ते स्वतःसाठी रोजगार शोधतायत. स्वतःसाठी दिल्लीत जातात. स्वतःसाठी सुरतला जातात. गुवाहाटीला जातात. पण लोकांसाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेलेत आणि महारष्ट्रासाठी काहीतरी मागितलं आहे. मुख्यमंत्री दिल्लीत फक्त स्वतःसाठी जातात. लोकांसाठी जातनाहीत, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हणत जोरदार टीका केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.