छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानिया उच्च न्यायालयात, निर्दोष मुक्ततेला आव्हान

3

मुंबई: महाराष्ट्र सदन घोटाळ्यात राष्ट्रवादीचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्याविरोधात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात छगन भुजबळ यांच्यासह त्यांचा मुलगा पंकज आणि पुतणे समीर भुजबळ यांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

यासंदर्भात अंजली दमानिया यांनी टि्वट करत माहिती दिली. त्यांनी म्हटले की, छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेच्या आदेशाला एसीबीने आव्हान दिले नाही आणि म्हणून एक सामाजिक कार्यकर्त म्हणून मी उच्च न्यायालयात गेले. सत्र न्यायालयाने दिलेल्या मुक्ततेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले.

काय आहे प्रकरण?

छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळात जारी करण्यात आलेल्या विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाल्याचा आरोप होता. महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ११ जून २०१५ रोजी स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर १५ जून २०१५ रोजी सक्तवसुली संचालनालयानेही भुजबळांविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये दोन गुन्हे दाखल केले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.