कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून द्या – छगन भुजबळ

8

अवकाळीसह अनेक संकटांनी शेतकरी अडचणीत आला आहे. यातून पुन्हा उभे राहण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असताना त्यांची वीज खंडित केली जाते. त्यामुळे शेतकरी जोपर्यंत अडचणीत आहे तोपर्यंत शेतकऱ्यांची वीज तोडली जाऊ नये. तसेच शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत दिवसा ठरविक वेळेत वीज उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री आ. छगन भुजबळ यांनी आज तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहात केली.

एकीकडे दुरुस्त झालेला ट्रान्सफॉर्मर लावला की तो दुसऱ्याच दिवसी नादुरुस्त होतो अशी सध्याची परिस्थिती आहे. तसेच महावितरण शेतकऱ्यांना आठ तास दिवसा आणि आठ तास रात्री वीज उपलब्ध करून देते असे सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात दिवसा वीज उपलब्ध करून दिली जात नाही, हे सत्य आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

दरम्यान, यावरील उत्तरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रान्सफॉर्मरच्या येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आरडीएसएस योजनेच्या माध्यमातून ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविण्यात येत आहे. यासाठी सुमारे तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था करून देण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती सभागृहाला दिली.
इतर मागासवर्गीय विभागाकडून वसतिगृहांबाबत निघालेल्या आदेशानुसार वसतिगृहात केवळ व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. असे असल्यास गावखेड्यात विद्यार्थ्यांना योग्य सुविधा मिळत नसल्याने ते शहरात शिक्षणासाठी कसे येऊ शकणार? यामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून योग्य तो मार्ग काढण्याची मागणी  छगन भुजबळ यांनी केली. या वसतिगृहाच्या प्रश्नावर सारथी, बार्टी, स्वाधार यासारख्या संस्थांचे नियम जशास तसे लावण्यात येऊन ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची विनंती त्यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.