नाना पटोलेंची जीभ छाटा आणि तब्बल एख लाख रुपये बक्षीस मिळवा’, भाजप नेत्याची उघड धमकी
जालना: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मी मोदीना मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो’ असं वक्तव्य केलं होत. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. बीजेपी कार्यकर्त्यांनी काल दिवसभरात राज्यात आंदोलन देखील केली आहेत. पण आता मुद्याची लढाई गुद्यावर आली आहे. कारण ‘नाना पटोलेंची जीभ छाटा 1 लाख मिळवा’ अशी घोषणाच जालन्यातील भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांनी केली आहे. त्यामुळे आत काँग्रेसही आक्रमक झाल्याचं चित्र आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्या विरोधात जालना भाजप युमो चांगलीच आक्रमक झाली. जिल्हाध्यक्ष प्रा. सुजित जोगस यांनी तर चक्क नाना पटोलेंची जीभ छाटून आणा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा, अशी वादग्रस्त स्कीम जाहीर केली आहे. जोगस यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार देखील दिली आहे.
दरम्यान, नाना पटोले यांचा पंजा छाटणार अशी भाषा करणाऱ्या अनिल बोंडे यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते दिलीप ऐडतकर यांनी केली आहे. ‘नानांनी लक्षात ठेवावं शाहिस्ते खानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल. उगीचच गमच्या मारू नको अमरावती वरून पोरं निघाले आहेत पंजा सांभाळून ठेवावा, असे वक्तव्य माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केलं होतं.