काँग्रेसमधील अतंर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर… नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पदावरुन हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. नाना पटोले यांच्याऐवजी शिवाजीराव मोघेंना अध्यक्ष करण्याची मागणी समर्थकांनी केली आहे. विदर्भातील २४ नेत्यांनी हि मागणी केली आहे. पटोले यांनी प्रदेश काँग्रेसमध्ये गटबाजी आणली , पक्षात दलित – मुस्लिम आणि आदिवासी यांना दूर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.