पुणे पोलिसांकडून दहीहंडीसाठी नियमावली जाहीर; जाणून घ्या काय असणार नियम

पुणे: मागील दोन वर्षनंतर राज्यात दहीहंडी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दोन वर्षानंतर राज्याभरात होणाऱ्या दहीहंडी बघण्यासाठी गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे पुणे शहरात पुणे पोलिसांनी दहीहंडीसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

पुण्यात यंदा रात्री 10 वाजेपर्यंत जल्लोष करता येणार आहे. दहीहंडीच्या दिवशी पुणे पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त ठेवणार आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांचे अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर एसआरपीएफची तुकडी, शीघ्र कृती दल, होमगार्ड, दामिनी पथके, गुन्हे शाखा विशेष शाखेचा साध्या वेशातील बंदोबस्त असणार आहेत. दहीहंडीच्या  पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे शहर वाहतूक पोलिसांचे आवाहन केले आहे.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दही हंडीबाबत महत्व पूर्ण घोषणा केली आहे. हीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. त्याबरोबर पुढील वर्षापासून प्रो-गोविंदा ही स्पर्धा सुरू केली जाईल. दहीहंडी दिवशी सर्वजनिक सुट्टी देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.