पुणे : जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठीच्या वेळेत बदल, वाचा काय आहे आदेश

12

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील भागात आता नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आता सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत लोकांना खरेदी येणार आहेत, त्यासाठीचा नवीन आदेश पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने काढण्यात आला आहे.

पूर्वीच्या आदेशानुसार काही ठिकाणी सकाळी १० ते १२ तर काही ठिकाणी सकाळी १० ते २ अशी वेळ देण्यात आली होती. आता सर्व कार्यक्षेत्रासाठी वेळ एकच असणार आहे. भाजी, फळे, जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांनी हातमोजे, सॅनिटायजर, फेस शिल्ड वापरासोबतच, सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक केले आहे. ३ मे या तारखेपर्यंत वेळेत हि वाढकरण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

निश्चितच या निर्णयामुळे किराणा दुकान, भाजी,फळे व्यावसायिक यांच्या इथे होणारी गर्दी कमी होईल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही.