पुणे पोलिसांच्या सामुहिक प्रयत्नामुळं, बालेवाडी परिसरातील अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण सुरक्षित परतला!

पुणे: पुण्यातील बालेवाडी हायस्ट्रीट जवळील पाठशाळा परिसरातून अपहरण झालेल्या स्वर्णव सतीश चव्हाण उर्फ डुग्गू या चार वर्षीय चिमुरडा आठ दिवसानंतर पुनावळे येथे तो सापडला असून अपहरणकर्ते पळून गेले असल्याची माहिती समोर आली आहे.  त्याच्या शोधासाठी सोशल मीडियावर अनेकांनी आवाहन केलं होतं. अखेर हा मुलगा सुखरुप घरी परतला आहे.

पुण्यातील बालेवाडी हायस्ट्रीट जवळील पाठशाळा परिसरातून स्वर्णव चव्हाण उर्फ डुग्गू या चार वर्षांच्या चिमुरड्याचं अपहरण झाल्याचा संशय होतं. तसं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं होतं. गेल्या दहा दिवसांपासून त्याचा शोध सुरु होते. दरम्यान, स्वर्णवचे वडील सतीश चव्हाण सोशल मीडियावरुन अपहरणकर्त्यांना वारंवार आवाहन करताना दिसले होते. हवे तितके पैसे घ्या, मात्र माझ्या लेकराला सोडा, अशी आर्त विनवणी सतीश चव्हाण केली होती.

स्वर्णम चव्हाण याचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात केल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलली. त्याच्या शोधासाठी पोलीस पथकांच्या माध्यमातून शोध सुरु होता. खूप गुप्तता पाळून हा तपास सुरू होता, जवळपास तीनशेहून अधिक पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलांचा शोध घेत होते. अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले आहे. चतुश्रृंगी पोलिसात याबाबत तक्रार आली होती, कशासाठी अपहरण केलं किंवा हा याचे कारण पोलिस शोधत आहेत. अखेर मुलाला आठ दिवसांनंतर शोधण्यात यश आले आहे. कोणी अपहरण केलं? का केलं? हे मात्र अजून कळू शकते नाही, त्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत. तसेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी पुणे पोलीसांचे अभिनंदन केले आहे.