पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यातील नियम लागू असताना व पर्यटकांना जमावबंदी असताना देखील खडकवासला धरण परिसरात रविवारी पर्यटकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे.
राज्यसरकारने कलम १४४ लागू केले असले तरी नागरिकांकडून मात्र त्याचा फज्जा उडविण्यात येत आहे. राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात महापुराने थैमान घातलेले असताना धरणातून देखील पाण्याचा मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, पण परिस्थितीचे कोणतेही भान पुणेकर नागरिकांकडून ठेवण्यात येत नसून सरकारी नियम पायदळी तुडविले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या परिसरात पोलिसांकडून गस्त घालण्यात येत होत्या पण सध्या त्यालाही विराम मिळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. सरकारी नियमांच्या उल्लंघनासोबतच पाण्याचा विसर्ग सुरु असताना भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास प्रशासन जवाबदारी घेणार का ? असा सवाल सजग नागरिकांकडून केला जात आहे.