छातीवर हात ठेवून कसले बोलता, सभागृहात बोलण्याची ही पद्धत नाही; नीलम गोऱ्हेंनी गुलाबराब पाटलांना झापलं
मुंबई: पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसी सुद्धा विधान परिषदेत चांगलेच गरमागरमीचे वातावरण बघायला मिळाले आहे. यामध्ये शिंदे गट आणि शिवसेना आमदार एकमेंकावर टीका करण्याची एकही संधी सध्या सोडत नाहीत. अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाच्या म्हणून ओळखल्या डॉ. नीलम गोऱ्हे या गुलाबराव पाटील यांच्यावर कमालीच्या संतापल्याचं यावेळी पाहायला मिळाले आहे.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या गदारोळादरम्यान, संपातल्या होत्या. वारंवार विनंती करुनही आमदारांचा गदारोळ सुरु हाता. यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील मी तुम्हाला वारंवार विनंती केली, ताकीद दिली, खाली बसा आधी ताबडतोब. ही कुठली पद्धत आहे सभागृहात वागायची. संसदीय कार्यमंत्री आपण यांना समज देऊ शकत नाही? परत परत सभापती सांगतायत, ही कुठली पद्धत आहे? चौकात आहात का तुम्ही?, अशी ताकीद दिली. यानंतर गुलाबराव पाटील यांनी मी मंत्री आहे! यावर डॉ. नीलम गोऱ्हे मंत्री काय? मंत्री तुम्ही घरी, आधी खाली बसा. हे सभागृह आहे. दरेकरजी काय चाललंय? हे अहो शांत राहा, असे म्हणाल्या.
शिक्षकांच्या बाबतीत निर्णय झालेला असतानाही त्याबाबतचा निधी थांबवल्यावरून सत्ताधारी विरोधकांच्यात गोंधळ झाला. त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी ज्या प्रकारे सभागृहात भाषण केले, त्यावरुन नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप नोंदवला. गुलाबराव पाटलांना निलम गोऱ्हेयांनी झापले.