किरण पावसकर यांच्या रक्ता रक्तात बेईमानी भरली आहे, किशोरी पेडणेकर यांचे टीकास्त्र

6

शिंदे गटाची मंगळवारी वरळी येथे सभा पार पडली. या सभेच्या तयारीदरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनीं  मातोश्री, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. या टिकेवरून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले कि, किरण पावसकर हे कॅरेक्टर पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. किरण पावसकर यांच्या रक्ता रक्तात बेईमानी भरली आहे, अशा शब्दात पेडणेकर यांनी टीका केली आहे.

पेडणेकर यांनी पुढे म्हटले कि, पावसकर यांच्या धडकणाऱ्या हृदयाला उद्धव ठाकरे यांनी चांगले डॉक्टर आणून अगदी खर्चासाहित त्यांचं हृदय जिवंत ठेवलं. एवढं करूनही ६ वर्षांपूर्वी त्यांच्यासोबत बेईमानी केली, राष्ट्रवादीत गेले ,आमदार झाले. उद्धवजींना तुम्ही घरी नाही बसवले उलट उद्धवजी घराघरात, मनामनात पोहोचवले. षडयंत्र करून तुम्ही कामगिरी केली आहे.

पेडणेकर यांनी पुढे म्हटले कि, आदित्य ठाकरे यांनी तुम्हाला काम करत असतांना लहानपणीं पाहिलं , त्यांना माहिती नव्हत कि तुमच्या रक्तात इतकी बेईमानी आहे ते. त्यामुळे पावसकर बोलताना नीट विचार करून बोलायचं, असा सज्जड दम भरल्यासारखेच प्रत्युत्तर  किशोरी पेडणेकर यांनी दिले.

किरण पावसकर नेमकं काय म्हणाले ? 

आदित्य ठाकरे यांनी असे आव्हान दिले कि एकनाथ शिंदे यांनी वरळीत आमच्या विरोधात उमेदवार देऊन दाखवावा, तसेच ठाण्यात देंखील निवडणूक लढायला तयार आहे. यावरून किरण पावसकर यांनी म्हटले कि,  एकनाथ शिंदे यांनी सहा महिन्यात कर्तृत्व दाखवलं आणि सहा महिन्यात उद्धव ठाकरे यांना घरी बसवलं. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं जे काही केलंय, ते वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंना हे करणं गरजेच आहे. आदित्य लहान आहे, तो करतोय , त्याच्या पद्धतीने त्याने करणं गरजेचं आहे, असे पावसकर यांनी म्हटले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.