असा दानशूर आमदार होणे नाही..! गुरांचा गोठा, ट्रॅक्टर,आंब्याची कलमे वणव्यात जळून खाक झालेल्या शेतकऱ्याला भरत गोगावले यांची तात्काळ मदत

77

महाड : रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले हे नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेचा विषय असतात. त्यांचा स्पष्टवक्तेपणा अनेकदा त्यांना अडचणीत देखील आणतो. पण या पलीकडे त्यांचा मध्ये असणारा पालक अनेकांना माहित नाही.

आमदार भरत गोगावले गेली तीन टर्म महाड विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात आपल्याकडे येणाऱ्या गोरगरीब जनतेला सढळ हाताने कायमस्वरूपी मदतीचा हात ते देत असतात. आपल्या दरवाज्यात आलेला आणि अडीअडचणीत सापडलेला मग तो कोणत्याही पक्षाचा कोणत्याही धर्माचा नागरिक असो त्याला आपल्या परीने सढळ हाताने मदत करणं हे परम कर्तव्य मानतात म्हणून दिवसातून शेकडो लोक भेट घेऊन आपली अडचण सांगून आर्थिक मदतीची मागणी करतात. त्या नागरिकांची अडचण समजावून घेत त्याला आपल्या परीने तातडीची आर्थिक मदत करून अडीअडचणीतून बाहेर काढण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्यामुळेच त्यांच्या शिवनेरी या निवास्थानी दररोज जनता दरबार भरलेला पाहायला मिळतो आणि या दरवाजातून कधीही अडचणीतला माणूस खाली हाताने परत जात नाही हे विरोधक देखील आवर्जून सांगत असतात आणि त्यामुळेच मतदार संघाचा आमदार नाहीतर कुटुंब प्रमुख असणाऱ्या दिलदार आमदार भरत गोगावले यांना जनसामान्य नागरिक आदराने, प्रेमाने शेठ म्हणतात.

पावसाळा संपल्यानंतर कोकणात वनवे लागणे आणि लावणे हे प्रकार कायमस्वरूपी घडत असतात, असाच एक प्रकार महाड तालुक्यातील धामणे गावात हद्दीत घडला. कोणीतरी वनवा टाकल्याने धामणे गावातील रहिवासी आनंद शिवराम जाधव यांचा गुरांचा गोठा, शेती कामात वापरणारा ट्रॅक्टर आणि जवळपास 30 आंब्याची कलमे जळून खाक झाली. याची बातमी स्थानिक तेज मराठी न्यूज चैनल ने प्रसारित केली होती, या घटनेची तात्काळ दखल घेत धामणे गावातील आनंद शिवराम जाधव या शेतकऱ्याला बोलावून घेत गोगावले यांनी स्वतः त्यांना आर्थिक मदत दिली आणि नुकसान भरपाई मिळवून देण्याचा विश्वास दिला. नुकसानग्रस्त शेतकरी जाधव यांनी गोगावले यांचे मनापासून आभार व्यक्त केले. असा दानशूर आमदार होणे नाही असे भावनिक उद्गार देखील यावेळी जाधव यांनी काढले. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख दिलीप शिंदे यांच्या सह आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रमुख पदाधिकारी हे देखील उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.