देवेंद्र फडणवीस हे जगातलं दहावं आश्चर्य, संजय राऊत यांचे टीकास्त्र

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगू लागली आहे. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केले ज्यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरु  झाली. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर सरकार स्थापन झालं होत, असे फडणवीस म्हणाले. या वक्तव्यावरुन खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे. राऊत यांनी म्हटले कि फडणवीस हे जगातलं दहावं आश्चर्य असल्याचे म्हटले.

राऊत यांनी माध्यमांना प्रतिकिया देताना म्हटले कि, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून याप्रकारची वक्तव्य येत आहेत. त्यावरुन फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य आहेत. आधीच आठ आश्चर्य या जगात आहेत. आणखी दोन आश्चर्य दिल्लीत आहेत आणि एक महाराष्ट्रात , असे राऊत यांनी म्हटले.

राऊत पुढे म्हटले कि, माणसाने किती खोटं बोलावं याला मर्यादा असतात. तुम्ही विश्वासघात केल्याने हे घडलं. फडणवीस यांनी आधी त्यांची जुनी वक्तव्य काढून बघावी. ते स्वतः अमित शहांसमोर काय बोलले होते? त्यामुळे स्वतःच विश्वासघात केल्यानंतर आता गळा काढण्यात काहीही अर्थ नाही. या शपथविधीला शरद पवार यांची मान्यता असती तर ते सरकार पाच वर्ष चाललं असत, असे राऊत यांनी  स्पष्ट केले. उद्या फडणवीस म्हणतील कि सहा महिन्यांपूर्वी जी बंडखोरी झाली ती शरद पवार यांच्या सांगण्यावरून झाली. एका वैफल्यातुन ते बोलत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.