‘त्यांनी पुन्हा चिंचवडचे नावच घेऊच नये’ , चंद्रशेखर बावनकुळे यांचा अजित पवारांना टोला

25

कसबा आणि चिंचवड येथील निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. भाजपकडून जोरदार प्रचार सुरु आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिवसभर प्रचारात सहभाग घेतला. खरं तर हि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर हि पोटनिवडणूक होत असल्याने आपण बिनविरोध निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला विनंती केली होती. पण अखेर निवडणूक लागली. असे स्पष्ट करत बावनकुळे यांनी पुढे म्हटले कि, त्यामुळे २६ फेब्रुवारीला कमळासमोरच बटन जोरात दाबा  आणि अजित पवारांना ४४० व्होल्टचा असा करंट लागला पाहिजे, कि पुन्हा त्यांनी चिंचवडचे तणाव घेऊ नये, असे बावनकुळे यांनी म्हटले.

बावनकुळे यांनी संपूर्ण  दिवसभर प्रचारात सहभाग घेतला. अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ भाजपने  जोरदार कंबर कसली आहे. चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार आहे. भाजपच्या अश्विनी जगताप , महविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात ठिणगी लढत होणार आहे. महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरु आहे. मनसेने भाजपाला पाठिंबा दर्शवला आहे.
केन्द्रीय मंत्री अमित शाह हे देखील पुण्यात येणार आहेत. यासोबतच गिरीश बापट हे आजारी असून देखील निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाली होते. त्यामुळे कसबा आणीन चिंचवड या दोन्ही ठिकाणी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला  लावण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.