जो धनुष्यबाण चोराला आहे तोच धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला सामोरे या, मग बघू… उद्धव ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान

निवडणूक आयोगाने काल दिलेल्या निर्णयावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले आहे. या निर्णयामुळे ठाकरे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना या निर्णयावर प्रतिकिया दिली आहे.