पुण्यात केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते ‘मोदी @२०’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : पुण्यात शनिवारी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते मोदी @२० या पुस्तकाच्या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अमित शाह याची केलेल्या भाषणाने साऱ्यांची मने जिंकली. चंद्रकांत पाटील यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. “मोदी@२०” या मराठी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमितभाई शाह यांच्या शुभहस्ते झाले. मोदी@२० पुस्तक म्हणजे भारताच्या उज्ज्वल भविष्याचं रेखांकन आहे. मोदीजींना समजून घेण्यासाठी आधी त्यांची कठोर तपस्या समजून घेतली पाहिजे, असे अनेक मोदीजींचे पैलू त्यांनी सांगितले, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

 

 

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सुरक्षित आणि समृद्ध भारत आणि अंत्योदयचा मंत्र दिला. आज आपलं अंत्योदय आणि सुरक्षित भारताचं स्वप्न साकार झालंय. आता समृद्ध भारत बनवायचा आहे. आपल्या भारताला परम वैभव बनवायचं आहे. त्यासाठी आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व जागांवर भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार विजयी व्हावेत, त्यासाठी कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत, असे आवाहन अमितभाईंनी यावेळी केले.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, पंकजा मुंडे , भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री शिवप्रकाशजी, भाजपा उपाध्यक्ष आणि पुस्तकाचे अनुवादक माधव भांडारी, पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपा पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांच्या सह भाजपाचे सर्व आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.