बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नक्की विजयी होतील, हा विश्वास अधिक दृढ झाला – चंद्रकांत पाटील

16
बारामती : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील रविवारी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. बारामतीतील महायुतीतील काही कार्यकर्त्यांच्या घरी चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.
बारामतीचे माजी नगराध्यक्ष सुनिल पोटे यांचे वडील हरिभाऊ पोटे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. सर्वप्रथम चंद्रकांत पाटील यांनी  पोटे कुटुंबियांच्या निवासस्थानी भेट देऊन दिवंगत हरिभाऊ पोटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच पोटे कुटुंबियांचे सांत्वन देखील केले.
दरम्यान पाटील यांनी भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य अविनाश मोटे आणि बाळासाहेब तात्या गावडे यांच्या निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी दोन्ही कुटुंबियांचे आदरातिथ्य पाहून पाटील भारावून गेले. यावेळी भाजपाचे सर्व नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
त्यांनतर बारामती प्रवासादरम्यान पाटील यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. दरम्यान, जेवरे कुटुंबियांशी अनेक अनौपचारिक विषयांवर चर्चा करून मनमोकळा संवाद साधला.
रिपाइं आठवले गटाचे शहराध्यक्ष संजय वाघमारे यांच्या घरी देखील पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी वाघमारे कुटुंबीयांनी अगत्याने स्वागत केले. वाघमारे कुटुंबीयांमधील जिव्हाळा अतीशय सुखावणारा होता. दरम्यान, परिसरातील नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने स्वागत केले. हा उत्साह पाहून बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नक्की विजयी होतील, हा विश्वास अधिक दृढ झाला असल्याचे पाटील यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.