भाजपा चित्रपट आघाडी हि आता पुणे कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात

पुणे : पुण्यात होणाऱ्या कसबा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपने प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. राज्यातील महायुतीच्या नेत्यांचे दौरे, प्रचार सभा, रॅली, पदयात्रा, तसेच रॅलीच्या माध्यमातून भाजपने सर्व वातावरण ढवळून काढले आहेत.

१०० हुन अधिक माजी नगरसेवक, आमदार, आणि सर्व पदाधिकारी झोकून देऊन या प्रचारात उतरले असताना आत भाजप चित्रपट कामगार आघाडी देखील या कसबा निवडणुकीच्या प्रचाराच्या मैदानात उतरली आहे.

भाजपा चित्रपट कामगार आघाडीकडून कसब्यात वास्तव्यास असलेल्या कलावंत, बुद्धीजीवी मंडळींशी संवाद साधायचे काम सुरू झाले आहे. कलावंत, साहित्यिक मंडळी यांचा प्रभाव असलेला मोठा वर्ग यामुळे आकर्षित होणार आहे आणि त्याचा फायदा निश्चितच महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना होणार आहे. या संवाद अभियानामध्ये चित्रपट कामगार आघाडीचे महाराष्ट्राचे जनसंपर्क प्रमुख कौस्तुभ दबडगे, प्रदेश चिटणीस केतन महामुनी, पुणे शहर अध्यक्ष अमित अभ्यंकर, पुणे जिल्ह्याचे संघटन सरचिटणीस शामराव कुलकर्णी, सरचिटणीस नंदिनीताई पुरंदरे, चिटणीस दीपालीताई कुलकर्णी, अश्विनीताई जोशी, अनिताताई देशमुख आणि शहराचे सरचिटणीस आशय रानडे, चिटणीस स्वप्नील दबडगे आणि उपाध्यक्षा वर्षा मराठे कुलकर्णी आदी पदाधिकारी सहभागी झाले असून या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात रचनेत काम करत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!