उद्धव ठाकरे हे जर बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर…. , सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

सर्वोच्च न्यायालयात  मागील तीन दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु आहे. ठाकरे गटाकडून वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी  बाजू मांडत आहेत. दोन्ही वकिलांनी ठाकरे गटाची बाजू जोरदार पणे मांडली. परंतु यावेळी न्यायालयाने असे मत व्यक्त केले कि, उद्धव ठाकरे हे जर बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर परिस्थिती वेगळी असू शकली असती.

आज मनू सिंघवी यांनी  युक्तिवाद करताना म्हटले कि,  २९ आणि ३० जून रोजी घडलेल्या घटनाक्रमाचा उल्लेख केला. २९ जून रोजी सर्वोच्च न्ययालयाने विश्वसदर्शक ठराव सभागृहात मांडण्याला परवानगी दिली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.
सभागृहात बहुमत चाचणीसाठी परवानगी देण्यात आली. पण ३९ आमदारांनी विरोधात मतदानन केलं असलं तर ती अपरिहार्य ठरली असती, असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला. मतदान चाचणीमध्ये अपमान सहन करण्यापेक्षा आधीच बाजूला होणं हा एक निष्कर्ष त्यातून काढला गेला. ३० जून  रोजी जे झालं , ते बदलणं अशक्य आहे, असे सिंघवी यांनी म्हटले.

सिंघवी यांनी बाजू  मांडल्यावर न्यायालयाने म्हटले कि, जर तुम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेला असता, ज्यात खुल्या पद्धतीने मतदान होत. आणि हरला असता तर त्या ३९ आमदारांमुळे नेमका काय परिणाम झाला ते स्पष्ट होऊ शकलं असतं. तुम्ही विश्वासदर्शक ठराव हरला असता तर ते अपात्र ठरल्यानंतर तुम्ही तो ठराव जिंकला असता, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!