माझ्यामुळे नाही तर या लोकांमुळेच आज विधिमंडळाची बदनामी होत आहे, संजय राऊतांचे हक्कभंगारून शिंदे सरकारला प्रत्युत्तर
संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केल्याप्रकरणी राजकीय वर्तुळात आक्रमक पडसाद उमटले आहेत. सभागृहात या विधानावरून सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. शिंद – भाजप ने आक्रमक भूमिका घेतली आहे. राऊतांविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी सभागृहात आज करण्यात आली. या प्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.