माझ्यामुळे नाही तर या लोकांमुळेच आज विधिमंडळाची बदनामी होत आहे, संजय राऊतांचे हक्कभंगारून शिंदे सरकारला प्रत्युत्तर

संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केल्याप्रकरणी राजकीय वर्तुळात आक्रमक पडसाद उमटले आहेत. सभागृहात या विधानावरून सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. शिंद – भाजप ने आक्रमक भूमिका घेतली आहे. राऊतांविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी सभागृहात आज करण्यात आली. या प्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले कि, मी काय म्हणालो होतो , हे समजून घेतलं पाहिजे. विरोधकांना देशद्रोही म्हटलं जातं . ज्याप्रकारे शिवसेना आणि धनुष्यबाणाची चोरी करून काही लोक विधिमंडळामध्ये गेले. त्यांनी सरकार स्थापन केलं आणि आमच्यावर ते हल्ले करत आहेत असे राऊत यांनी म्हटले. विधिमंडळाबाहेर त्यांचा उल्लेख चोर, दरोडेखोर केला जातो. त्यांना उद्देशून मी ते विधान केलं होते. माझ्यामुळे नाही तर या लोकांमुळेच आज विधिमंडळाची बदनामी होत आहे, असे राऊत यांनी म्हटले.
राऊत म्हणाले कि, माझ्या विरोधात जर हक्कभंग आणण्यात आला, तर त्यावर चर्चा होईल, मी माझं म्हणणं तिथे मांडेन. मी तुरुंगात गेलेला माणूस आहे, त्यामुळे हक्कभंगाच्या कारवाईला मी घाबरत नाही, असे देखील राऊत यांनी म्हटले. मुळात हा विषय त्यांच्या पुरता मर्यादित आहे. त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. जय विधिमंडळाने मला राज्यसभेत पाठवलं , ज्या विधिमंडळाने शिवसेनेला सत्ता दिली, त्या विधिमंडळाविषयी माझ्या भावना अत्यंत बहुमोल आहेत, असे  देखील राऊत म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!