आजचा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या जनतेसाठी समर्पित – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई  : आज युती सरकारचा  पहिला अर्थसंकल्प दुपारी विधानसभेत मांडण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस हे वित्तमंत्री म्हणून आपला पहिला अर्थसंकल्प आज दुपारी २ वाजता विधानसभेत मांडतील. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यात जनतेच्या सूचना  व मतांचा देखील अंतर्भाव करण्यात आला आहे. आजचा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या जनतेसाठी समर्पित असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हटले आहे कि,  मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील युती सरकारचा हा प्रथम अर्थसंकल्प! युती सरकार आल्यानंतर राज्याच्या आणि जनतेच्या हिताचे अनेक निर्णय आम्ही घेतले. आजचा अर्थसंकल्पदेखील महाराष्ट्राच्या जनतेसाठीच समर्पित असेल, असे चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विट मध्ये नमूद केले आहे.
थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. फडणवीसांच्या पोतडीतून काय बाहेर पडणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. या अर्थसंकल्पातून सामन्यांना नेमकं काय मिळणार ? , शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच आपल्याला मिळणार आहेत.