वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी नवीन धोरण राबविणार … निश्चितच राज्यभरात मोठी रोजगारनिर्मिती होईल – चंद्रकांत पाटील

मुंबई  : वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नवीन धोरण राबवण्याची योजना केली आहे. यामुळे निश्चितच राज्यभरात मोठी रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला .

देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना वस्त्रोद्योग क्षेत्राबाबत महत्वपूर्ण घोषणा केली. त्यांनी सांगितले कि, वस्त्रोद्योग व खाणीकर्म उद्योगाला चालना देण्यासाठी सन २०२३ – २४ मध्ये शासन नवीन धोरण जाहीर करेल असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी स्थानिक पातळीवर तसेच दावोस येथे एक लाख पन्नास हजार कोटी रुपयांपेक्षा आधी रकमेपेक्षा गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. सन २३- २४ या आर्थिक वर्षात १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त थेट परकीय गुंतवणुक प्राप्त होईल . यातूनच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल , असेही फडणवीसांनी सांगितले.

राज्याचा २०२३-२४ या वर्षाचा ५ लाख ४७ हजार ४५० कोटींचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत गुरुवारी सादर केला. या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे  चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले .