अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उल्हासनगरमध्ये छापेमारी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटीची लाच देण्याप्रकरणी एका डिझायनर मुली विरोधात आणि तिच्या वडिलांविरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. य प्रकरणी आता आणखी माहिती समोर आली आहे ती म्हणजे उल्हासनगर मध्ये छापेमारी करण्यात आली आहे. उल्हासनगर मध्ये बुकी अनिल जयसिंघानी याच्या घरावर मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने छापा टाकला आहे.  त्यांची मुलगी अनिक्षा आणि मुलगा  अक्षन हे दोघे घरात होते.

आज झालेल्या छापेमारीत पोलिसांनी या दोघांची चौकशी केली परंतु त्यांनी चौकशी टाळण्याचा प्रयत्न केला. अक्षन याने रुग्णालयात दाखल असल्याचे कारण दिले. यासोबतच मुलीने आपली परीक्षा सुरु असल्याचे कारण देत चौकशी टाळली.
देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सभागृहात देखील माहिती दिली. डिझायनर अनिक्षाने याआधी मला आणि माझ्या कुटुंबियांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता. अनेकदा धमक्याही देण्यात आल्या. मला अडचणीत आणण्यासाठी हा ट्रॅप होता असा आरोप फडणवीस यांनी केला. अमृता याकनहैवर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही कामे करण्यासाठी प्रयन्त झाला आहे. पैशांची ऑफर देण्यात आली ब्लॅकमेल करण्यात आली.   अनिल जयसिंघानी नावाची व्यक्ती यामध्ये सहभागी आहे. मागील सात – आठ वर्षांपासून फरार आहे. त्यांच्यावर १४ ते १५ गुन्हे दाखल आहेत. आमची बदनामी करण्याचा प्रयन्त केला जात असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.