शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या आमदारांचा सभात्याग
सात दिवस झाले सरकारी कर्मचारी संपावर आहेत आणि सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही. गारपीटीने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे. मात्र पंचनामे करायला कोणी नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदयांनी आदेश काढावेत त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला खडसावले. राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत अजित पवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडला आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, तुम्हाला हक्क व मागण्या मागायच्या आहेत. परंतु माणुसकीची भावना ठेवून पंचनामे करावेत, असे आवाहन अजितदादांनी संपकऱ्यांना केले.
राज्यात द्राक्ष, आंबा, डाळींब, केळी, कांदा अशा अनेक पीकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संप असल्याने हतबलतेची भूमिका शासनाने घेऊ नये, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.